Jalna OBC Sabha : राज्यात मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण (Maratha-Obc) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण (Obc Reservation) देऊ नयेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा (OBC Sabha) आयोजित करण्यात आली होती. या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर होते. यावेळी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून भुजबळ विरुद्ध जरांगे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. जरांगे यांनी वारंवार भुजबळांवर निशाणा साधला होता आता भुजबळांनी जारांगेंवर जोरदार टीका केली आहे. “आमची लेकरंबाळं, आमची लेकरंबाळं.. मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का रे बाबा..” असा टोला भुजबळांनी यावेळी लगावला. (Bhujbal Vs Jarange Patil)
“भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्व कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”अशी टोलेबाजी देखील यावेळी भुजबळांनी केली. (Obc Sabha in Jalana)
“मोदींनी दिलेलं १० टक्के आरक्षणात ८५ टक्के मराठा समाजाचे लोक आहेत. ६० टक्क्याच्यावर ४० टक्के आरक्षणात मराठा आहे. आमच्या २७ टक्क्यात कुणबीही आहे. तुम्हाला नाही असं नाही. मराठा विद्यार्थ्याला वस्तीगृह नसेल तर ६ हजार रुपये मिळतो. तो ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नाही. १० ते ११ हजार कोटी वाटले आहेत” असंही भुजबळांनी यावेळी म्हंटले.