BJP-JJP Alliance । हरियाणातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप आणि जेजेपीची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येतंय. हरियाणातील भाजप आणि जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांच्या युती सरकारसाठी आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हरियाणा सरकारचे मंत्रिमंडळ आज सामूहिक राजीनामा देण्याची शक्यता आहे. यानंतर हरियाणा सरकारचे नवे मंत्रिमंडळ स्थापन केले जाऊ शकते. हरियाणात आता या सर्व घडामोडीवरून भाजप आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांच्यात युती होणार नसल्याचे म्हटले जातंय.
आज विधिमंडळ पक्षाची बैठक BJP-JJP Alliance ।
हरियाणातील विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी 12 वाजता बोलावण्यात आलीय. अर्जुन मुंडा व तरुण चौक हे निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त आले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा होणार होती. वास्तविक जेजेपी लोकसभा निवडणुकीत भाजपकडे 1 ते 2 जागांची मागणी करत आहे.
जागा वाटपावरून पेच कायम BJP-JJP Alliance ।
याआधी सोमवारी दुष्यंत चौटाला यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली होती मात्र निवडणुकीतील युतीबाबत चर्चा होऊ शकली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप प्रत्यक्षात जेजेपीला जागा देण्याच्या बाजूने नाही. हरियाणा भाजपही जेजेपीला जागा देण्याच्या बाजूने नाही. भाजपला सर्व दहा जागांवर निवडणूक लढवायची आहे.
दरम्यान, हरियाणाचे अपक्ष आमदार नयन पाल रावत म्हणाले की, मी काल मुख्यमंत्री खट्टर यांची भेट घेतली होती. आम्ही मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या सरकारला आमचा पाठिंबा आधीच दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होऊ शकते. मला वाटते जेजेपीसोबतची युती तोडण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.