Anil Patil on Sharad Pawar। राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. या निवडणुकीत सध्या सगळ्यात चर्चिला जाणारा मतदारसंघ म्हणून बारामतीकडं पाहिलं जात. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी “मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे”, असं वक्तव्य करून नव्या वादाची ठिणगी टाकलीय. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या राजकारण सुरु आहे. तसेच अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी शरद पवारांच्या या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिलीय.
महिलांना प्राधान्य देणाऱ्या पवारांनी… Anil Patil on Sharad Pawar।
शरद पवारांनी विधान केले त्यावेळी कोणाचेही नाव घेतले नाही परंतु त्यांचा रोख सुनेत्रा पवार यांच्याकडेच होता असे म्हटले जात आहे. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावर अनिल पाटील यांनी,”शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केल्यासारखं वक्तव्य केलंय. लेकीला सुनेसारखं वागवा, असं शरद पवारांनी सांगणं अपेक्षित आहे. परंतु, सुना बाहेरच्या असतात, असं ते म्हणाले. महिलांना प्राधान्य देणाऱ्या पवारांनी हे वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं, असे अनिल पाटील यांनी म्हटले.
सुनेसाठी तिरस्काराची भावना येत असेल तर Anil Patil on Sharad Pawar।
“मुळात या वक्तव्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. सुना या बाहेरून आलेल्या असल्या तरी त्यांना लेकीप्रमाणे वागवलं पाहिजे हे वक्तव्य अपेक्षित आहे. पूत्रप्रेम राहिलं नाही म्हणून सुनेसाठी तिरस्काराची भावना येत असेल तर असं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कोणीच करू शकत नाही”, असंही अनिल पाटील म्हणाले.
बारामतीतील जनतेशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, “तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल.” तर दुसरीकडे अजित पवारांच्या वक्तव्यामुळे शरद पवारांनीही त्यांना प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले “मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे.”असे पवारांनी म्हटले.