देशात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत आहे. असे असताना करोना लसीकरणाचेही काम वेगाने सुरू आहे. देशात 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि अन्य जणांना लस देण्यात येणार आहे. याच दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने करोना लसीबाबत एक प्रश्न उपस्थित केल्याने सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले.
सोनम कपूरने ट्वीट करत करोना लसीबाबत एक प्रश्न उपस्थित केला. सोनमने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, मला कोणी सांगू शकेल का आमच्या ग्रॅंडपॅरेंटस् आणि पेरेंट्सना भारतात कधी लस मिळणार आणि ती कधी उपलब्ध होणार? मी खूपच कंफ्यूज आहे? प्रत्येक जणांकडून मला वेगवेगळी माहिती मिळत आहे.
सोनम कपूरच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर तिला जोरदार ट्रोल करण्यात आले. काही युजर्सने तिला सरकारी वेबसाइट पाहण्याचा सल्ला दिला. तर काही जणांनी तिला ट्रोल करत लिहिले की, तुझ्या फोनमध्ये गुगल नाही का? स्वतः सर्च करून पाहा. अन्य एका यूझरने लिहिले की, सोनम मॅम आपल्या घरी न्यूज पेपर येत नाही का, तुम्हाला तर सरकारी योजनांबाबत माहिती असली पाहिजे.