Anant Ambani weight । भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अनंत-राधिकाची प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाली आहेत. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर आकर्षणाचे केंद्र बनत आहेत.
या सगळ्यामध्ये अनंत अंबानींचे काही जुने फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्यांचे वजन खूप वाढले होते आणि कमी देखील झाले होते.
अनंत अंबानींनी वजन कमी करण्याच्या आपल्या अविश्वसनीय प्रवासाने सर्वांना प्रेरित केले होते. 18 महिन्यांत तब्बल 108 किलो वजन कमी करून त्याने सिद्ध केले की काहीही अशक्य नाही.
अशा परिस्थितीत जेव्हा लोकांनी त्याच्या वाढलेल्या वजनाचे फोटो पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि जाणून घ्यायचे होते की अनंतचे वजन पुन्हा कसे वाढले?
‘या’ कारणामुळे अनंत अंबानींचे वजन वाढले । Anant Ambani weight
लोकांना या प्रश्नाचे उत्तर तेव्हा मिळाले जेव्हा अनंत अंबानीची आई नीता अंबानी यांनी 2017 मध्ये एका मुलाखतीत सांगितले की, ‘त्यांच्या मुलाला दम्याचा गंभीर त्रास आहे, त्यामुळे त्यांना खूप स्टेरॉइड्सवर ठेवावे लागले, आणि स्थूलपणाचा आजार जडला. परिणामी अनंतचे वजन पुन्हा वाढले.’ असं त्यांनी सांगितलं होत.
दम्याच्या उपचारात स्टेरॉईड औषधांचा वापर श्वसनाच्या नळ्या उघडण्यास मदत करतो, ज्यामुळे श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. मात्र, त्याच्या दुष्परिणामामुळे देखील वजन वाढते.
दीर्घकालीन वापरामुळे काही लोकांमध्ये वजन वाढू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टेरॉईड औषधांच्या वापरामुळे चयापचय गती कमी होते ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही आणि वजन वाढते.
असा होता अनंत अंबानी यांचा डाएट प्लान? । Anant Ambani weight
2016 मध्ये अनंत अंबानी यांनी अवघ्या दीड वर्षात 108 किलो वजन कमी केले. रिपोर्ट्सनुसार, वजन कमी करण्यासाठी ते पाच ते सहा तास वर्कआउट करत असून 21 किलोमीटर चालत असे. योगासने हा देखील त्यांच्या दिनचर्येचा एक भाग होता.
सोबतच वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षण फंक्शनल ट्रेनिंग आणि कार्डिओ करायचे. अनंत यांनी वजन कमी करण्यासाठी झिरो-सेव्हर, हाय-प्रोटीन आणि लो-फॅट लो-कार्ब आहाराचे पालन केले.
दररोज तो 1200 ते 1400 कॅलरीज घेत असतं. याशिवाय त्यांनी आपल्या आहारात हिरव्या भाज्या, कडधान्ये, मोड आलेले धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ, चीज आणि दूध यांचाही समावेश केला. यासोबतच त्यांनी त्या काळात जंक फूडही टाळले.
स्टेरॉईड म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत? । Anant Ambani weight
जर आपण सोप्या भाषेत समजले तर, स्टेरॉईड हा एक प्रकारचा हार्मोन आहे जो शरीरात तयार होतो. परंतु आपण बाहेरून जे स्टेरॉईड वापरतो ते नैसर्गिक संप्रेरकांचे कृत्रिम रूप असतात.
स्टेरॉईड स्नायूंच्या वाढीस मदत करतात आणि दम्यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. हे गोळ्या, सिरप आणि द्रव स्वरूपात बाजारात उपलब्ध आहेत.