Stalin government in trouble : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते कुलाशेखरपट्टीनम येथे भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या लॉंच कॉम्प्लेक्सची पायाभरणी करण्यात आली. मात्र आता याच प्रकल्पाच्या संदर्भात एका नव्या वादाने जन्म घेतला आहे. त्याचे कारण म्हणजे तमिळनाडूतील स्टॅलीन सरकारमध्ये अनिता राधाकृष्णन नावाच्या एक मंत्री आहेत. त्यांच्याकडून या प्रकल्पाच्या संदर्भात स्थानिक माध्यमांमध्ये जाहीरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या जाहीरातील सगळी माहिती देण्यात आली आहे. मात्र एक सगळ्यांत मोठी चूक झाली आहे. जाहीरातीतील रॉकेटवर चीनचा झेंडा लावण्यात आला आहे.
ही मोहीम भारताच्या इस्त्रोची आहे. रॉकेट भारताचे आहे मग त्यावर चीनचा झेंडा कसा आला असे प्रश्न आता उपस्थित करण्यात आले आहेत. सत्ताधारी द्रमुक पक्ष याचे काही उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतानाच विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने याचा मोठा मुद्दा बनवला आहे. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यावरून मोठा राजकीय हल्लाबोल केला आहे. | Stalin government in trouble
द्रमुकला भारताची प्रगती सहन होत नाही. द्रमुकचे लोक भारताच्या शास्त्रज्ञांचा अपमान करत आहेत. हे लोक तमिळनाडूच्या जनतेचा, तेथील करदात्यांचाच अपमान करत आहेत अशी टीका मोदी यांनी केली आहे. तर द्रमुकचे चीन प्रेम असे समोर आले असल्याची टीका भाजपच्या अन्य नेत्यांनी केली आहे. संबंधित जाहीरात द्रमुकची चीनच्या प्रती असलेली कटीबध्दताच दर्शवते. आपल्या देशाच्या सार्वभौमतेची यातून उपेक्षा केली गेली आहे अशी टीका तमिळनाडू भाजप अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली आहे. | Stalin government in trouble
दरम्यान, द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनीही यावर घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. हे चित्र कुठुन आले याची आपल्याला कल्पना नाही. मात्र भारताने चीनला आपले शत्रु राष्ट्र घोषित केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: चीनच्या पंतप्रधानांना आमंत्रण देतात आणि त्यांना महाबलिपुरम येथे घेऊन जातात हे आपण पाहिले आहे. त्यांना सत्य स्विकारायचे नसते त्यामुळे अशी दिशाभूल करण्याचे काम ते करतात असे कनिमोळी यांनी म्हटले आहे. | Stalin government in trouble