घरातून अज्ञात व्यक्तीने दागिने लांबविले

नगर – घरच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून अज्ञात चोरांनी घरातील अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने व मोबाईल असा ऐवज चोरून नेला. ही घटना मयूर अपार्टमेंट, जुना मंगळवार बाजार, नगर येथे मंगळवारी सकाळी घडली.

निखील कैलास सोनवणे (वय-25 रा. मयूर अपार्टमेंट,जुना मंगळवार बाजार नगर) यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, व मोबाईल चोरून नेला. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात निखील सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.