मायणी अभयारण्यात सहा हजार बीजगोळ्यांचे रोपण

भारतमाता विद्यालयाचा उपक्रम

मायणी – झाडांभोवती वर्षभर बिया पडतात. पाऊस पडल्यानंतर त्यातील काही बिया उगवतात. तर काही तशाच कुजून जातात. उगवलेली लहान रोपटी जगतीलच याचा कसलाही भरोसा नाही. त्यामुळे बिया संकलन करून उपशिक्षक महेश उर्फ सयाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे सहा हजार बीजगोळे (सीड बॉल) तयार करुन वन महोत्सवाचे औचित्य साधून येथील भारतमाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मायणी अभयरण्यामध्ये बीजगोळे फेक करून त्याचे रोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा चांगला संदेश दिला आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एन. इनामदार यांच्या मार्गदर्शनानुसार उपशिक्षक महेश जाधव यांनी वन महोत्सवानिमित्त बीजरोपण करण्यासंदर्भात विद्यालयात विद्यार्थ्यांना बीजगोळे तयार करण्यासंदर्भात एक दिवसीय प्रशिक्षण देऊन माती व शेण समप्रमाणात घेऊन त्याचे योग्य मिश्रण करुण त्यामध्ये झाडांच्या बिया (बीज) मध्ये घालून त्या तयार करुन सीडबॉल बनवण्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी सुमारे सहा हजार सीड बॉल तयार केले. तयार केलेले बीजगोळ्यांचे रोपण कसे करावे याबाबत मुलांना माहिती देण्यात आली. त्यानुसार विद्यालयातील सर्व शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी मायणी अभयारण्यात मायणी-कलेढोण रस्त्याच्या दोंन्ही बाजुला वनविभागाच्या असणाऱ्या जागेमध्ये या बीजगोळ्यांचे फेक करून रोपण केले.

सीड बॉल बीजरोपणाचे तंत्रज्ञान प्रामुख्याने जपानमध्ये वापरले जाते. ज्यात वृक्षांची बिजे माती व शेणाने आच्छादून पेरली जातात. जेणेकरुन वृक्ष बिजांचे प्रादुर्भावापासून संरक्षण होते. त्यामुळे या बिजापासून योग्य प्रकारची रोपे तयार होतात. गेली चार वर्षे हा उपक्रम राबविला जात असून या वेळेला केवळ सहा हजार चिंचोके या बियांचा वापर करून बीजरोपण करण्यात आले आहे.

– सयाजी उर्फ महेश जाधव उपशिक्षक, भारतमाता विद्यालय मायणी

Leave A Reply

Your email address will not be published.