भूकंपानंतर तुर्कस्तान आणि सीरियातून केवळ विध्वंसाची चित्रे समोर येत आहेत. दोन्ही देशांत मिळून 26 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात एका भारतीयालाही आपला जीव गमवावा लागला आहे.
6 फेब्रुवारीच्या भूकंपानंतर बेपत्ता असलेल्या विजय कुमार या भारतीय नागरिकाचा मृतदेह आज सापडल्याची माहिती तुर्कीतील भारतीय दूतावासाने दिली आहे. तुर्कीतील मालत्या येथील हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, ते तुर्कस्तानला बिझनेस ट्रिपवर गेले होते.
We inform with sorrow that the mortal remains of Shri Vijay Kumar, an Indian national missing in Turkiye since February 6 earthquake, have been found and identified among the debris of a hotel in Malatya, where he was on a business trip.@PMOIndia @DrSJaishankar @MEAIndia
1/2— India in Türkiye (@IndianEmbassyTR) February 11, 2023
मृतदेह भारतात आणण्याची तयारी सुरू –
दूतावासाने विजय कुमार यांचे कुटुंब आणि प्रियजनांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. दूतावासाने सांगितले की, आम्ही शक्य तितक्या लवकर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याची व्यवस्था करत आहोत.