Arvind Kejriwal Arrest । Us Protest : गेली अनेक वर्षे दिल्लीतील केजरीवाल यांचे सरकार एका दुष्टचक्रात अडकले आहे. त्यांना कामच करू न देण्याचा जणू चंगच केंद्र सरकारने बांधला आहे की काय, असे वाटावे अशी ही स्थिती आहे. । Arvind Kejriwal Arrest
केजरीवाल सरकारच्या अधिकारांवर गेल्या अनेक दिवसांपासून केंद्राने गदा आणली आहे. त्यांना स्वतंत्र कारभार करताच येणार नाही अशी व्यूहरचना केंद्राने केली असल्याचं सतत बोललं जातं. सध्या मुख्यमंत्री केजरीवाल ईडीच्या कोठडीत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी, 21 मार्चला संध्याकाळी अटक केली. त्यांची अटक अशा वेळी झाली आहे जेव्हा देशात काही दिवसांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. अश्या परिस्थिती त्यांना अटक झाल्याने अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
त्यांच्या अटकेवर परदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. जर्मनीनंतर आता अमेरिकेने केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील विरोधी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर लक्ष ठेऊन आहोत, असं अमेरिकेने म्हटलं आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते म्हणाले की, “मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेच्या रिपोर्ट्सवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. त्यांच्या विषयात निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेनुसार कायदेशीर प्रक्रियेच पालन होईल अशी अपेक्षा करतो.” असं ते म्हणाले आहेत. । Arvind Kejriwal Arrest
अन् भारतने जर्मनीला सुनावलं –
या सगळ्या प्रकरणाशी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असं जर्मनीने म्हटलं आहे. केजरीवाल यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय आपले कायदेशीर अधिकार मिळाले पाहिजेत. भारताने जर्मनीच्या या वक्तव्यावर तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला होता.
भारताने जर्मनीच्या राजदूताला बोलवून घेत नाराजी प्रगट केली. जर्मन मिशनचे डेप्युटी चीफ जॉर्ज एनजवीलर यांना बोलवून भारताने आपला निषेध नोंदवला. । Arvind Kejriwal Arrest