नवी दिल्ली – अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता काबीज केली आहे. यानंतर देशात अराजक माजले असून विविध देश आपापल्या नागरिकांना येथून सुखरूप बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने देखील अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.
अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, परराष्ट्र मंत्रालयाला अफगाणिस्तानातील घडामोडींबाबत देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या ट्विटनंतर संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, “गुरुवारी सकाळी ११ वाजता परराष्ट्रमंत्री संसदेच्या मुख्य समिती कक्षामध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत माहिती देतील.” अशी माहिती ट्विटरद्वारे दिली.
Floor Leaders of Political Parties would be briefed by EAM @DrSJaishankar on the present situation in Afghanistan, on 26th August, 11am in Main Committee Room, PHA, New Delhi. Invites are being sent through email. All concerned are requested to attend. https://t.co/iBX9NRd0qq
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) August 23, 2021