नवी दिल्ली : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर लगेचच जनतेला महागाईचा मोठा धक्का बसला आहे. अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढ केल्याचे निवेदन अमूलने जारी केले आहे. दुधाचे वाढलेले दर आजपासूनच लागू होणार आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता अमूलचे ताजाचे अर्धा लिटर दूध 27 रुपयांना मिळणार आहे. तर 1 लिटर पॅकेटसाठी 54 रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गोल्ड अर्थात फुल क्रीम दुधाचे अर्धा किलोचे पॅकेट आता 33 रुपयांना मिळणार आहे.
तर 1 लिटरसाठी 66 रुपये मोजावे लागतील. अमूल गायीच्या एक लिटर दुधाचा दर 56 रुपयांवर पोहोचला आहे. अर्ध्या लिटरसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीचे A2 दूध आता 70 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे.
अमूल दूध 3 रुपए तक महंगा हो गया।
पिछले 1 साल में '8 रुपए' दाम बढ़े हैं।
• फरवरी 2022: अमूल गोल्ड 58 रुपए लीटर
• फरवरी 2023: अमूल गोल्ड 66 रुपए लीटरअच्छे दिन❓️
— Congress (@INCIndia) February 3, 2023
अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.