नवी दिल्ली – हुंडा प्रथा हा भारतात कायदेशीर गुन्हा आहे. पण, आजही अनेक ठिकाणी हुंडा प्रथा प्रचलित आहे. लोकहो, आजही वधूचे वडील आपल्या मुलीला हुंडा म्हणून महागड्या भेटवस्तू देतात. पण, आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत जिथे हुंड्याच्या नावावर महागड्या भेटवस्तूंऐवजी वधूचे वडील मुलांना विषारी साप देतात.
हे जाणून तुम्हाला विचित्र वाटले असेल, पण हे खरे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेशातील गोरिया समुदायाच्या लोकांमध्ये ही विचित्र प्रथा शतकानुशतके सुरू आहे. गोरिया जमातीचे लोक आपल्या मुलीच्या लग्नानंतर जावयाला एक- दोन नव्हे तर तब्बल 21 विषारी साप देतात. मुलीच्या लग्नात साप दिल्याने पती-पत्नीचे नाते घट्ट राहते, अशी या समाजाची धारणा आहे. जावयाला साप दिला नाही तर मुलीचे नातेही तुटू शकते.
या संदर्भात स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, मुलीचे लग्न ठरल्यानंतर गोरिया समाजातील वडील हुंडा देण्यासाठी साप पकडण्यास सुरुवात करतात. या प्रथेनुसार मुलीचे वडील गणहुआनसारखे विषारी साप मोठ्या प्रमाणात पकडून तिला देतात. गौरीया समाजातील लोक हे व्यवसायाने सर्पमित्र असल्याची माहिती आहे. त्यांचे काम साप पकडणे असून हेच त्यांचे जगण्याचे साधन आहे.
गोरिया समाजातही सापांना सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय कडक नियम आहेत. त्याचबरोबर त्यांच्या टोपलीतील साप मेला तर सापाच्या मृत्यूवर संपूर्ण कुटुंब मुंडन करतात, असे सांगितले जाते. यासोबतच ते या समाजातील सर्व लोकांना श्राद्धाचे भोजनही खाऊ घालतात. या जमातीच्या लोकांच्या घरात लहान मुलेही विषारी सापांशी खेळताना दिसतील.