मराठी सिनेसृष्टीत पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत.त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत.
View this post on Instagram
अमृताने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृताने पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. विशेष म्हणजे अमृताने विना मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
View this post on Instagram
यापूर्वीही अमृता खानविलकरने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याच यादीत सगळ्यात जास्त ग्लॅमरस मराठमोळी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जात आहे.अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.
View this post on Instagram
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.
लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल.
View this post on Instagram
‘अल्बम काढाल काय’ हे बहुचर्चित ‘चोरीचा मामला’ या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियावर हिट झालं होत. अतिशय ग्लॅमरस आणि हॉट लुकमध्ये अमृता खानविलकरनं या गाण्यावर ठुमके लगावले आहेत.