सूर्याच्या फोटोला अमिताभ म्हणाले लोणावळ्याची चिक्की

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच ऍक्‍टिव्ह असतात. त्यांच्या मजेदार कॉमेंटस आणि त्यांनी शेअर केलेल्या अनेक फिल्मी किश्‍शांना भरपूर लाईक मिळत असतात. सोनम कपूरने पोस्ट केलेल्या एका फोटोला अमिताभ बच्चन यांनी अशीच मजेदार कॉमेंट केली आहे. त्यावरून सोशल मीडियावर हसण्याचे फवारे उडायला लागले आहेत. सोनमने सूर्याच्या पृष्ठभागाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हजारो प्रकाश वर्ष दूर असलेल्या सूर्याच्या पृष्ठभागाचा फोटोही आपण बघू शकत आहोत, असे सोनमने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.


हा फोटो बघून अमिताभ बच्चन यांनी भन्नाट कॉमेंट केली आहे. “हा फोटो चिक्कीचा क्‍लोजअप आहे, असे वाटते आहे.


लोणावळ्याची चिक्की’ असे बच्चन यांनी म्हटले आहे. त्यांची ही कॉमेंट नेटिझन्सबरोबर सोनमलाही खूप आवडली “हाहा हा हा… गोड आहे.’ असा रिप्लाय तिने दिला. सोनम कपूर सर्वात शेवटी “द झोया फॅक्‍टर’मध्ये दिसली होती. हा सिनेमा तर आपटला होता. तर अमिताभ बच्चन यांचे “ब्रम्हास्त्र’, “चेहरे’ आणि “गुलाबो सिताबो’ हे तीन सिनेमे लवकरच येत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.