औरंगाबाद – एकतर्फी प्रेमातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरूणीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये जळीतकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेवर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये पीडित महिला 95 टक्के भाजली आहे. घटना घडताच पोलिसांनी आरोपी संतोष मोहिते याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातील ही घटना आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक केली आहे. आरोपी गावात राहणारा असून संतोष मोहिते असे त्याचे नाव आहे. आरोपी संतोष मोहिते हा गावात बिअर बार चालवतो. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, सोमवारी वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेत ती पीडित ४० टक्के होरपळली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.