मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक तसेच बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत 180 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.
सोशल नेटवर्किंग साइटवरून आपल्या चाहत्यांशी नियमित संवाद साधणारे बिग बी यांच्या ट्विटर फॉलोअर्सचा आकडा आज चार कोटींवर पोहोचला. बॉलीवूडमधील बहुतांश कलाकारांची ट्विटर अकाऊंट आहेत, पण त्यामध्ये सर्वात जास्त अमिताभ हेच सक्रिय असतात.
सदी के महानायक अमिताभ बच्चन सर
के टि्वटर पर फॉलोअर्स ४ करोड़ हुए।
बहुत-बहुत बधाई सर आपको @SrBachchan
Congratulations ???@prashantkawadia @JaniJasmine @SwetaLoveAB @BhagyashreeKol @EdellaSaee @Purva007 @ganeshlahoti @sanjay_patodiya @BeejalBhatt @ashokmistry4545 pic.twitter.com/e5cCkV6OLY— EF Âshfaaq ? (@KhatriAshfaaq) February 6, 2020
अमिताभ बच्चन हे सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ट्विटरप्रमाणेच फेसबुक, इन्स्टाग्रामवरही त्यांचे अकाऊंट आहे. टंबलरवर त्यांचा वैयक्तिक ब्लॉगही आहे. हजारो चाहते दररोज या अकाऊंटवर अमिताभ यांना फॉलो करत असतात.
BAADDDUUMMBBAAAA !
Shahenshah Of Indian Cinema #AmitabhBachchan sir Hits 40 Million Followers On Twitter ??#AB40MillionOnTwitter @SrBachchan Heartiest Congratulations Sir , wish you many more… ??????? pic.twitter.com/l9qoo3MKLh
— Sաɛta Pʀasad ɛғ™ (@SwetaLoveAB) February 6, 2020
त्यांनी लिहिलेले संदेश, जागवलेल्या आठवणी यांना लाइक्स करत असतात. त्यावर प्रतिक्रियाही देत असतात. ट्विटरवर अमिताभ यांचे आता 4 कोटी 2 हजार 202 फॉलोअर्स झाले आहेत आणि त्यात वाढ होत आहे.
#AB40MillionsOnTwitter pic.twitter.com/LOFBXazlI1
— Sunetra GangulyEF (@GangulySunetra) February 6, 2020
फेसबुकवर त्यांचे 2 कोटी 70 लाख तर इन्स्टाग्रामवर 1 कोटी 40 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्यानंतर 3 कोटी 90 लाख ट्विटर फॉलोअर्ससह शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.