‘कोरोनाने बाधित ३० हजार लोकांना मारण्याची परवानगी द्या’

चीन सरकारची सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक मागणी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसने चीनमध्ये चांगलाच तांडव घालत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५६० वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही ३० हजारांवर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने धक्कादायक निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या ३० हजार लोकांना मारण्याची परवानगी द्या, अशी धक्कादायक मागणी चीन सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली असल्याचे कळते आहे. या वृत्ताला पुष्टी मिळाली नसली तरी सोशल मीडियावर हे वृत्त फिरत आहे.

कोरोना व्हायरसने भयंकर रुप धारण केलं आहे. हा व्हायरस असाच वाढत राहिला तर आणखी लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या लोकांना मारण्याची परवानगी द्या, यामुळे व्हायरसचा संसर्ग रोखता येईल, अशी मागणी चीन सरकारने न्यायालयात केल्याचे या मेसेजमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, कोरोना’ विषाणू उद्रेकाचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेलाही बसणार हे हळूहळू स्पष्ट होत आहे. सोमवारी चीनमधील शेअरबाजाराने गेल्या 13 वर्षांमधील नीचांकी पातळी गाठली. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणावर समभागांची विक्री केल्याने निर्देशी सूचकांकाची 7.7 टक्के इतकी मोठी घसरण एका दिवसात झाली. कोरोनाचे संकट लवकर दूर झाले नाही तर येत्या तीन महिन्यात चीनी शेअरबाजारांचे अडीच लाख कोटी रूपयांचे नुकसान होऊ शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.