Amit shah on Uddhav thackeray | लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहताना दिसून येतायत. प्रत्येक पक्षाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. निवडणूक आयोगाकडूनही तयारी केली जातीय. त्यातच लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपाने कंबर कसली असून एक मोठा डाव आखलाय. भाजप मित्रपक्षसोबत मिळून येत्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे तर दुसरीकडे इंडियामध्ये सर्व विरोधी पक्षाचे नेते जागावाटपावर चर्चा करत आहे.
अशात गेल्या काही महिन्यांत विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी भाजपात आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे देशात एनडीएची ताकद वाढू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी बिहारमधील भाजपाचे जुने सहकारी नितीश कुमारही एनडीएत परतले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली ते म्हणाले,’मला तुमचीही गरज आहे. तुम्ही ज्वाईन करा. आमचा पक्ष परिवार नियोजन मानते. पक्षातील कार्यकर्त्याचं परिवार नियोजन मानत नाही. भाजपच्या अजेंड्याशी जे सहमत आहेत त्या सर्वांचं भाजपात स्वागत आहे. आमच्या अजेंड्यावर चालायचं आहे फक्त असं शाहा म्हणाले. यावेळी त्यांना नितीश कुमार यांना आणि उद्धव ठाकरे यांन सोबत घेण्याबाबत विचारण्यात आलं.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा
Bollywood News । पती रोहनप्रीतपासून वेगळे होण्याच्या अफवांवर नेहा कक्करने तोडले मौन