Amit Shah Car Number। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गाडीची नंबर प्लेट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलीय. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायत. याच कारणही खासच आहे, कारण अमित शाह यांच्या कारचा क्रमांक ‘DL1 CAA 4421’ आहे. त्यांच्या गाडीवरील CAA ला नागरिकत्व दुरुस्ती कायद्याशी जोडण्यात येतंय. यामुळेच लोकांची नजर अमित शाह यांच्या गाडीच्या नंबर प्लेटचे फोटो लोकांनी चांगलेच व्हायरल केले आहेत.
अमित शाह यांच्या गाडीच्या नंबर प्लेटचे फोटो व्हायरल Amit Shah Car Number।
29 फेब्रुवारी रात्री अमित शाह भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही त्यांच्यासोबत होते. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. त्यात भाजपच्या उमेदवारांना कुठे तिकीट द्यायचे, कोणत्या जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करायची, यावर चर्चा झाली. मात्र, ही बैठक मुख्यालयात सुरू असतानाच बाहेर शहा यांच्या गाडीबाबत चर्चा सुरू झाली. कारण होते त्यांच्या गाडीचा नंबर आणि त्यांची नंबरप्लेट.
अमित शाह यांच्या कारचा क्रमांक ‘DL1 CAA 4421’ आहे. त्यांच्या गाडीवरील CAA ला नागरिकत्व दुरुस्ती कायद्याशी जोडण्यात येतंय. यामुळेच लोकांची नजर अमित शाह यांच्या गाडीच्या नंबर प्लेटचे फोटो लोकांनी चांगलेच व्हायरल केले आहेत. लोकांनी सोशल मीडियावर यावर वेगवेगळ्या कमेंटन्स करण्यास सुरुवात केली. ज्यात एका युझरने अमित शहाच नाही तर त्यांच्या कारची नंबरप्लेटपण CAA म्हणत आहे असे म्हटले. तर दुसऱ्या युझरने नंबरप्लेटवरून आगामी योजना काय आहे याचा अंदाज बांधलाय.
CAA म्हणजे काय? Amit Shah Car Number।
CAA (नागरिकत्व सुधारणा कायदा, 2019) हा नागरिकत्व सुधारणा कायदा विधेयकाचा एक प्रकार आहे, ज्याचा उद्देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे हा आहे. हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी या सहा समुदायांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.
हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये अत्याचार सहन करून भारतात आलेल्या त्या देशांतील अल्पसंख्याक लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.