Amit Shah Birthday: नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांसह अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा, PM मोदी म्हणाले, ‘मी अनेक वर्ष अमित भाईंसोबत…’

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे. ते 57 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मेदी, राजनाथ सिंह यांसह अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शहा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी अनेक वर्ष अमित भाईंसोबत काम केले आहे. पक्ष आणि सरकार मजबूत करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. ते अशाच उत्साहात देशाची सेवा करत राहोत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो’.

नितीन गडकरींनी दिल्या शुभेच्छा –

शहा यांच्या जन्मदिनानिमित्त केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गडकरी यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘केंद्रीय कॅबिनेटमधील माझे सहकारी गृहमंत्री अमित शहा यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चांगले आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी इश्वराकडे प्रार्थना करतो’, अशा शुभेच्छा नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

2014 नंतर पक्षाला मोठ्या उंचीवर नेले-

22 ऑक्टोबर 1964 रोजी जन्मलेले 57 वर्षीय अमित शहा यांना भारतीय जनता पार्टीचे चाणाक्य मानले जाते. जुलै 2014 मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षाचा पदभार स्विकारल्यानंतर पक्ष विस्तारासाठी त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि पक्ष कार्यकर्त्यांना जागृत करण्याचे कार्य केले. शहा यांनी पहिल्यांदा 1997 मध्ये सरखेज विधानसभा पोटनिवडणूकीत नशीब अजमावले आणि तेव्हापासून 2012 पर्यंत सातत्याने पाचवेळा तेथे आमदार म्हणून निवडून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.