मुंबई – आत्ता कुठे मिसरुड फुटलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने राजसाहेबाचं नुसतं नाव उच्चारतानाही दहावेळा विचार करायला हवा. राजसाहेबांवर मिटकरीसारख्या बगलबच्च्यांनी टीका वगैरे करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. अशा शब्दात मनसे नेते अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना सुनावले आहे.
अमेय खोपकर म्हणाले की, आत्ता कुठे मिसरुड फुटलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने राजसाहेबाचं नुसतं नाव उच्चारतानाही दहावेळा विचार करायला हवा. राजसाहेबांवर मिटकरीसारख्या बगलबच्च्यांनी टीका वगैरे करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. दोन मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड मिटून ठेवावं हे एका राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाच्या अतिसामान्य नेत्याला कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैवी
राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे ..अशी जोरदार टीका अमोल मिटकरी यांनी केली होती.
मनसे राज ठाकरे यांनी ‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून मनसे व राष्ट्रवादीमध्ये जोरदार वादंग सुरु झाले आहे.
अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड…; अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर हल्लाhttps://t.co/7aydSDDweX@amolmitkari22
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 21, 2021
…म्हणून जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न; रोहित पवारांची राज ठाकरेंवर टीका https://t.co/pmyYmFUL59@RRPSpeaks @NCPspeaks
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 21, 2021