टेस्लाचे सीईओ आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी म्हटले आहे की टेस्ला एक ह्युमनॉइड रोबोट बनवत आहे जो घरी नोकर म्हणून काम करेल. त्याचा प्रोटोटाइपही पुढच्या वर्षापर्यंत तयार होईल. लोकांना जी करायला किचकट तसेच कंटाळवाणी कामे करायला आवडत नाही, अशी कामे करण्यासाठी डिझाइन केलेला हा रोबोट 5.8 फूट लांब आणि 125 पौंड वजनाचा असेल.
टेस्लाच्या एका कार्यक्रमात बोलताना अब्जाधीश उद्योजक एलन मस्क म्हणाले की, रोबोट रिंचसह गाड्यांना बोल्ट जोडण्यास किंवा दुकानात किराणा सामान हाताळण्यास सक्षम असेल. या रोबोला टेस्लाच्या कारखान्यांमधील स्वयंचलित मशीन आणि अनुभवाचा फायदा होईल आणि ते अधिक चांगले तयार केले जाईल. या रोबोटमध्ये कंपनी ऑटो पायलट ड्रायव्हर सहाय्याचा काही भाग देखील वापरेल. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही असतील.
मस्क पुढे म्हणाले की, हा रोबोट मानवांसाठी मित्रासारखा असेल आणि त्याला पराभूत करू शकणार नाही. या रोबोटमध्ये चेहऱ्याच्या स्वरूपात एक स्क्रीन बसवली जाईल. सध्या, टेस्लाने या रोबोटच्या व्यावसायिक लॉन्चिंगसाठी कोणतीही टाइमलाइन दिलेली नाही.
कामगारांची कमतरता दूर होईल
एलन मस्कने कामगारांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले आणि सांगितले की या रोबोटमुळे अर्थव्यवस्थेवर खोल परिणाम होईल. हा रोबोट खूप महाग न बनवणे, हे सध्या आमच्या कंपनीपुढील आव्हान असेल. टेस्लाच्या पूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीमची सुरक्षा आणि क्षमता यावर वाढत्या छाननी दरम्यान ही नवी संकल्पना आकारास आली. मस्क म्हणाले की पुढच्या वर्षी या रोबोटचा एक नमुना उपलब्ध होऊ शकेल.
कंटाळवाणे किंवा कठीण कार्य करण्यास सक्षम
धोकादायक, किचकट आणि कंटाळवाणी कामे करण्याच्या हेतूने हा रोबोट तयार करण्यात आला आहे. या रोबोटमुळे एखाद्या व्यक्तीला काहीतरी वस्तू घेण्यासाठी किंवा किराणा सामान ठेवण्यासाठी किंवा धोकादायक अशा गोष्टी करण्यासाठी खाली वाकण्यासाठी एक पर्याय मिळेल. मात्र मस्क यांनी टेस्ला तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेच्याबाबतीत भाष्य केले नाही.
कार क्रॅश झाल्या आहेत
अमेरिकेच्या सुरक्षा नियामकाने या आठवड्याच्या सुरुवातीला वाढत्या अपघातांमुळे टेस्लाच्या कार सहाय्यक यंत्रणेची तपासणी सुरू केली होती. टेस्लाच्या पूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग सिस्टीमच्या दाव्यांची चौकशी करण्यासाठी दोन अमेरिकन सिनेटर्सनी फेअर ट्रेड कमिशनलाही बोलावले आहे. मात्र, रोबोट कारपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.