सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द

श्रीनगर – करोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्या यात्रेचे स्वरूप केवळ प्रतिकात्मक ठेवले जाणार आहे. चालू वर्षी 28 जून ते 22 ऑगस्ट अशा 56 दिवसांच्या कालावधीसाठी यात्रेचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले होते.

मात्र, यात्रेकरूंच्या जीविताचे रक्षण करणे महत्वाचे असल्याने यात्रेचे आयोजन करणे इष्ट ठरणार नसल्याचे जम्मू-काश्‍मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी स्पष्ट केले.

अमरनाथ यात्रा रद्द झाली असली तरी भाविकांसाठी पवित्र गुंफेत होणाऱ्या आरत्यांचे व्हर्च्युअल प्रसारण केले जाणार आहे. सकाळी 6 आणि सायंकाळी 5 वाजता अशा दिवसातून दोन वेळा त्या आरत्या प्रत्येकी अर्धा तासासाठी प्रसारित होतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.