Amarnath Yatra 2024 : दक्षिण काश्मीर मधील अमरनाथ या देवस्थानचीयात्रा यंदा २९ जून पासून सुरू होणार आहे. हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतराजीत असलेल्या डोंगरावर अमरनाथ गुफा असून ती जमीनीपासून ३८८० मीटर उंचीवर आहे.
ही यात्रा १९ ऑगस्ट रोजी समाप्त होईल अशी घोषणा श्री अमरनाथ श्राइन बोर्डने आज केली. ५२ दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी आगाऊ नोंदणी उद्यापासूनच म्हणजे १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे मंडळाने सांगितले. । Amarnath Booking । Amarnath Yatra
ही वार्षिक यात्रा दुहेरी मार्गांवरून होते त्यात अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक ४८ किमीचा नुनवान-पहलगाम मार्ग आणि गंदरबल जिल्ह्यातील १४ किमीचा बालटाल मार्ग या दोन्ही मार्गावरून यात्रेकरू तिथे पोहचत असतात. देशाच्या सर्वच भागातून मोठ्या प्रमाणात यात्रेकरू या यात्रेत सहभागी होत असतात.
रक्षाबंधनाला अमरनाथ यात्रेची सांगता :
यंदाची अमरनाथ यात्रा १९ ऑगस्टला संपणार आहे. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा तिथी, श्रावणातील पाचवा सोमवार आणि भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधनही असेल. यात्रेच्या समारोपाच्या दिवशी शोभन योग असेल. त्या दिवशी पहाटे ५:५३ पासून सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग आहे, तो सकाळी ८:१० पर्यंत राहील.
अमरनाथ यात्रेचे महत्व :
पौराणिक कथेनुसार, बाबा अमरनाथाच्या पवित्र गुहेत शंकराने माता पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली. मात्र, कथेच्या मध्यभागी माता पार्वती झोपी गेली. असे म्हणतात की, त्या गुहेत शिव आणि माता पार्वती यांच्याशिवाय कबुतरांची जोडी देखील होती, त्यांनी अमरत्वाची कथा ऐकली होती.
देवी पार्वतीशिवाय इतर कोणीही अमरत्वाची कथा ऐकावी, अशी भगवान शंकराची इच्छा नव्हती. त्यामुळे कैलास पर्वतावरून निघताना त्यांनी नंदी, गणेश, वासुकी आणि इतर गणांना वाटेत सोडले. अमरनाथ यात्रेदरम्यान शंकराने सोडलेल्या त्या जागांना आज त्यांचे नाव देण्यात आले आहे. । Amarnath Booking । Amarnath Yatra