घरोघरी गुढ्या उभारून श्रीराम मंदीर उभारणी सोहळ्यात सर्वधर्मियांनी सहभागी व्हाव : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्या इथं प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. या अमृत सोहळ्यामध्ये सर्वधर्मीय नागरिकांनी घरोघरी गुढ्या उभारून सहभागी व्हावे. असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, या आनंद सोहळ्यामध्ये सर्वांनी सर्व धर्म समभाव सहभागी व्हावे. तसेच दारांमध्ये रांगोळी काढावी. घरोघरी श्री राम नामजप व श्रीराम स्त्रोत्र यांचे पठण करावे. सायंकाळी अंगणामध्ये पणत्या प्रज्वलित कराव्यात अस आवाहनही त्यांनी केलय. सर्वधर्मसमभावाचे व श्रद्धेचे प्रतिक ठरणाऱ्या अयोध्या येथील श्री राम मंदिराचे काम गेली कित्येक वर्षे रेंगाळलेले आहे. तेथे श्रीराम मंदिर साकारणे हे केवळ हिंदू धर्मीयांचे नव्हे तर सर्व धर्मीयांचे स्वप्न होते.

सर्व धर्मियांसाठी हा अमृत क्षण ठरणार आहे. हा सोहळा कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित साधुसंत,मुनीजण, अतिथी गण यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. आपण या सोहळ्यामध्ये पवित्र आयोध्यानगरी येथे जाऊन प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. म्हणून त्याच श्रद्धेने हा दिवस साजरा करावा असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.