राम जन्मला गं सखे राम जन्मला, अयोध्येत त्रेता युग अवतरले

गणेश पूजनाने मंदिर भूमीपूजनाचे धार्मिक विधी सुरु

अयोध्या – लक्षावधी देशवासीयांचे श्रध्दास्थान असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवर होणाऱ्या राममंदिराच्या भूमिपुजनाचे धार्मिक विधी सोमवारी सुरू करण्यात आले. गौरी गणेश पूजन करून या विधीचा श्रीगणेशा करण्यात आला.

भूमिपुजनाचा विधी तीन दिवस चालणार आहे. त्याच्या समारोपप्रसंगी होणारे भूमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे. हिंदूधर्मीय रिवाजानुसार कोणत्याही मंगला कार्याची सुरवात गणेश पूजनाने केली जाते.

गणेश पूजन सकाळी आठ वाजता करण्यात आले. यावेळी अकरा प्रकांड पंडितांनी मंत्रपठण केले. यानिमित्त देशभर विविध मंदिरात रामायणाचे पाठ पठण केले जात आहेत.

“अयोध्येत आज खऱ्या अर्थाने त्रेता युगच अवतरले आहे. या पवित्र शहरात आज एकच आवाज ऐकायला येतोय तो मंत्रोच्चारणाचा. आरती आणि रामायण पठणाचा. याला मंदिरातील घंटानादाची सुरेल पार्श्‍वभूमी आहे. हा विधी तीन दिवस चालेल. भूमिपुजन आणि मंदिरनिर्माणाच्या कार्याने त्याची सांगता होईल, असे स्थानिक पुजारी महंत सत्येंद्र यांनी सांगितले.

या पेक्षा अधिक पवित्र काय असू शकते. भगवान गणेशाच्या आशिर्वादाने या मंदिराचे निर्माण विनाअडथळा होईल. महंत कन्हैय्या दास सदस्य संत समिती

Leave A Reply

Your email address will not be published.