बेंगळूरू – दक्षिण आफ्रिकेतून 20 नोव्हेंबरला परतलेले सर्व 10 जण बंगळूरूमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्वजण बेंगळूरूमध्येच असल्याचे बृहत बेंगळूरू महानागर पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूची लागण झालेले दोघेजण गुरूवारी बेंगळूमध्ये सापडले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवरून आलेले 10 जण बेपत्ता झाले होते. तेंव्हापासून या सर्वांचा शोध सुरू होता.
दरम्यान ओमायक्रॉनचा पहिल्या रुग्णाने खासगी प्रयोगशाळेतील करोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर केला. त्यानंतर तो कर्नाटकातून निघून गेला आहे, असे कर्नाटक सरकारने शुक्रवारी सांगितले. हा 66 वर्षीय माणूस 20 नोव्हेंबरला द7णि आफ्रिकेवरून आला होता. त्यानंतर 27 नोव्हेंबरला तो लगेचच दुबईला निघून गेला, असे सरकारी माहितीवरून स्पष्ट झाले आहे. हा शांग्रिला हॉटेलमधून कसा निसटला हे शोधून काढण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे कर्नाटकचे महसूल मंत्री आर. रमेश यांनी सांगितले.
ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केरळ आणि महाराष्ट्रातील प्रवाशांनी देशांतर्गत प्रवासाच्या 72 तास आगोदर केलेली करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सादर करणे गरजेचे आहे.