आळंदी : श्री ज्ञानेश्‍वर संस्थेच्या शिक्षकांचा सन्मान

करोनाचे नियम पाळून शिक्षक दिन उत्साहात साजरा

आळंदी – श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, श्री ज्ञानेश्‍वर प्राथमिक विद्यामंदिरामधील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मच्याऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी शांताराम महाराज गांगुर्डे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे, उद्योगपती प्रशांत संघवी, शिक्षण आयुक्‍त कार्यालयाचे अधीक्षक कृष्णाजी ढाळे, डिजिटल प्रभातचे उपसंपादक ज्ञानेश्‍वर फड, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्‍वस्त प्रकाश काळे, सदस्य अनिल वडगांवकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले, सत्कार मूर्ती सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक-विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.

श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचा एक अनोखा उपक्रम गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून शिक्षक दिनानिमित्त वेगवेगळ्या आध्यात्मिक, ऐतिहासिक स्थळ, पर्यटन, निसर्गरम्य वातावरणामध्ये शिक्षकांना नेऊन त्यांचा सन्मान केला जातो. तसेच शिक्षक हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे तरी त्यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात संस्था पदाधिकाऱ्यांपासून ते शाळेच्या शेवटच्या घटकापर्यंत सर्वांचा सहभाग असतो. पण सलग दुसऱ्यावर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही निर्बंध असल्याकारणाने यावर्षीचा शिक्षक दिवस प्रशालेच्या सांस्कृतीक सभागृहामध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आगळा-वेगळा शिक्षक दिवस कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. विनाअनुदानित शिक्षकांविषयी तळमळ व्यक्‍त करीत त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्याबाबत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती केली. तसेच विद्या गांगुर्डे या विद्यार्थिनीने शिक्षका विषयीच्या भावना आणि ऋण व्यक्‍त केले.

याप्रसंगी करोना काळात संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा असलेल्या अमृतवेल पुस्तक व संस्थेचा फोटो चित्रित कॉफी कप देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी गणेश लिखे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले व त्यांना पौर्णिमा मोरे व हुले सर यांनी साथ दिली. तसेच आनंदाने संस्थेचे विश्‍वस्त प्रकाश काळे यांच्या वतीने शिक्षकांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिवले, शारदा साबळे यांनी तर प्रदीप काळे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.