“विद्यार्थ्यांचा विकास हाच मनी ध्यास’ या हेतूने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) शिक्षणाची सोय व्हावी म्हणून तज्ज्ञ संचालक असलेल्या महारिया चारीटेबल ट्रस्ट मुंबईने राजुरी येथे 6 नोव्हेंबर 2011 रोजी सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची स्थापना केली. या कॉलेजचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या हस्ते झाले. भविष्यातील आव्हाने पेलवणारे कुशल अभियंते या कॉलेजमध्ये घडवली जातात. ही संस्था बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन अकॅडमीक इन रुरल अँड ट्रॅबल एरिया या उपाधीने सन्मानित असून एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड मिळवणारी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिली संस्था आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांचे “बी’ प्लस श्रेणी प्राप्त कॉलेज आहे. कॉलेजमध्ये डिप्लोमासाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन इंजिनिअरिंग उपलब्ध असून डिग्रीसाठी मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक अँड टेली-कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही कोर्सेस यशस्वीपणे सुरू आहेत आणि आता नव्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डाटा सायंस ही नवीन
कोर्सेस सुरू झाली आहेत. त्याचबरोबर एम. इ. मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन डिझाईन हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आय. टी. आय. चे ट्रेड इलक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग आहेत. कॉलेजमध्ये दर्जेदार प्राध्यापक वर्ग, 100 टक्के डिजिटल ई-लायब्ररी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, विविध कंपन्यांशी प्लेसमेंट करार, कॅम्पस इंटरव्हिव याशिवाय मेकॅनिकल प्रॅक्टिकलसाठी आवश्यक बॉयलर फक्त सह्याद्री व्हॅली कॉलेजमध्येच उपलब्ध आहे.
10 वी चा 100 टक्के निकाल
शैक्षणिक भरारी घेत सीबीएसई न्यू दिल्ली मान्यताप्राप्त सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल. या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंत उत्तम शिक्षण दिले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, होमहवन,ओम मंत्रोच्चार, तज्ज्ञ शिक्षक, पिकप साठी बस सेवा,आरोग्यदायी जेवणासाठी स्वच्छ कॅन्टीन, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष,विद्यार्थ्याच्या अभ्यासाबरोबर खेळ व इतर कला प्रकाराकडे विद्यार्थ्यांचा कल पाहून विशेष लक्ष, शिक्षण फील्ड विझीट, योगा, म्युझिक क्लास, कंप्यूटर लॅब, डिजिटल क्लासरूम अशा विविध सुविधा, विद्यार्थ्याला समजेपर्यंत प्रेमाने आणि आपुलकीने शिकवण्याची पद्धत, भविष्यातील आव्हानांसाठी आवश्यक त्या सर्व कौशल्याचे शिक्षण स्कूलमध्ये दिले जाते.
– शब्दांकन : रामदास सांगळे, बेल्हे