फोर्ब्सने यावर्षीची सर्वाधिक उत्पन्न असलेल्या 100 सेलिब्रिटीची यादी प्रसिद्ध केली आहे. यावर्षीच्या यादीमध्ये अक्षय कुमारने सलमान खानला मागे टाकले आहे. अक्षयचे 2019 चे वार्षिक उत्पन्न 293.25 कोटी इतके होते. त्यामुळे तो आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमधील कोणाही सेलिब्रिटीने इतके उत्पन्न यापूर्वी दाखवलेले नाही.
सलमानचे उत्पन्न 229.25 कोटी होते. तो 2016 पासून दुसऱ्या क्रमांकावर होता. पण तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. कौन बनेगा करोडपती 11 मुळे अमिताभ बच्चन 239.50 कोटी उत्पन्नासह चौथ्या क्रमांकावर आहेत. या वर्षीच्या यादीमध्ये आलिया भट 8 व्या क्रमांकावर आणि दीपिका पदुकोण 10 व्या क्रमांकावर आहेत.
पहिल्या 10 मध्ये त्यांनी प्रथमच स्थान पटकावले आहे. याव्यतिरिक्त शाहरुख खान 6 व्या क्रमांकावर आणि रणवीर सिंह 7 व्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या यादीमध्ये स्थान मिळवलेल्या एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमधील अन्य सेलिब्रिटीजपैकी कपिल शर्मा (53), दिव्यांका त्रिपाठी (79), भारती सिंह (82) आणि करण कुंद्रा (92) यांनीही जागा मिळवली आहे.