Akbaruddin Owaisi : तेलंगणातील निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम यांच्यातील वाद आता संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या तेलंगणा विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी काँग्रेस सरकारने AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार उद्या शपथ घेणार आहेत.
असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हे ऑल इंडिया ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे हैदराबाद लोकसभा सीट अंतर्गत चंद्रयांगुट्टा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी सलग तिसऱ्यांदा या ठिकाणावरून विजय मिळवला आहे. ओवेसी यांनी भारत राष्ट्र समिती (BRS) चे एम सीताराम रेड्डी यांचा ८१,६६० मतांनी पराभव केला.
2018 च्या विधानसभा निवडणुकीतही अकबरुद्दीन ओवेसी चंद्रयांगुट्टा मतदारसंघातून 80264 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर ओवेसी यांना 95339 मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या शहजादी सय्यद यांना 15075 मते मिळाली होती. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत अकबरुद्दीन ओवेसी 59,274 मतांनी विजयी झाले होते. 2018 मध्ये चंद्रयांगुट्टा जागेवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने यावेळी सत्यनारायण मुदिराज यांना येथून तिकीट दिले होते, परंतु त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून शेवटच्या क्षणी आपले नाव मागे घेतले.
अकबरुद्दीन ओवेसी हे नेहमीच वादात उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावताना दिसले होते. यानंतर त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. याच निवडणुकीत अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका जाहीर सभेत म्हटले होते की, रेड्डी असो, बाबू असो की राव असो, प्रत्येकाकडून काम करून घेण्याची जादू आम्हाला माहित आहे. असे त्यांनी म्हटले होते.