Lalduhoma Oath Taking Ceremony : झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) नेते लालदुहोमा यांनी आज मिझोरामचे नवे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्तेच्या चाव्या आपल्याकडे घेतल्या आहेत. राजधानी ऐजॉल येथील राजभवनात आयोजित समारंभात राज्यपाल हरी बाबू कंभामपती यांनी लालदुहोमा यांना मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या सोबतच सुमारे 11 नेत्यांना मंत्रीपदाचीही शपथ देण्यात आली आहे.
याआधी मंगळवारी झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) च्या बैठकीत लालदुहोमा यांची पक्षनेतेपदी आणि के सपडांगा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली.
मिझो नॅशनल फ्रंटचे नेते आणि निवर्तमान मुख्यमंत्री झोरामथांगा, MNF विधिमंडळ पक्षाचे नेते लाल चंदमा राल्टे यांच्यासह सर्व आमदारांनी कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी माजी मुख्यमंत्री लाल थनहवला देखील उपस्थित होते.
मंगळवारी झेडपीएम विधिमंडळ पक्षाने लालदुहोमा यांना आपले नेते केले आणि के. उपनेतेपदी सपडांगा यांची निवड करण्यात आली. 40 सदस्यीय मिझोरम विधानसभेत मुख्यमंत्र्यांसह 12 मंत्री असू शकतात. 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ZPM ने 40 पैकी 27 जागा जिंकल्या आहेत.