‘अजित पवार’ यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. हा राजीनामा तातडीने मंजूर केल्याने अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. या घटनेनंतर अजित पवार यांनी त्यांचा फोन बंद ठेवल्याने याबाबतचे गुढ वाढले आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला.

अजित पवारांच्या राजिनाम्याचे वृत्त धडकल्याने त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत कुरबुरी आणि शिखर बॅंक घोटाळ्यातील कथित सहभाग यावरून हा राजीनामा दिला असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.