मुंबई – भारतीय संघातून सुमार कामगिरीमुळे स्थान गमावलेल्या अजिंक्य रहाणे याला आता आयपीएल स्पर्धेतही अपयश आल्याने कोलकाता नाईट रायडर्सने त्याला बेंचवर बसवण्याचा निर्णय घेतला.
पहिले पाच सामने त्याला खेळवण्यात आले होते. मात्र, त्यातही तो चमकदार कामगिरी करू शकला नाही त्यामुळे आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान दिले जात नाही. भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असे संबोधले जात असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात रहाणेला कोलकाता संघाने आपल्याकडे घेतले होते.
त्याच्या गुणवत्तेवर विश्वास दाखवत त्याला पहिले पाच सामनेही खेळवण्यात आले. मात्र, या पाचही सामन्यांत मिळून त्याने केवळ 80 धावा केल्याने त्याला संघातून डच्चू देत बेंचवरच ठेवण्यात येत आहे.