CM Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी त्यांनी 2 हजार कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी केली. यादरम्यान पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या. असंघटित आणि विडी कामगारांसाठी 350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.
सोलापुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, “देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईलच, पण महाराष्ट्रातही पुन्हा डबल इंजिन सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.
तसेच “सोलापूरच्या पवित्र भूमीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. मोदीजी म्हणाले होते शिलान्यास हमने किया है और उद्घाटन भी हम करेंगे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग यांचे उद्घाटन देखील मोदींनी केले होते. मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर वास्तवात होते. आम्हाला एका मोठ्या नेतृत्वाचे आशीर्वाद मिळाले आहेत”.असे शिंदेंनी म्हटले.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळीच दावोस दौऱ्यावरुन परत आले. यावेळी त्यांनी दावोस दौऱ्यातही मोदींचा जयजयकार असल्याचे सांगितले. “मी कालच दाओसवरून परतलो. दाओसमध्ये 3 लाख 53 हजार करोडच्या करारावर सह्या झाल्यात. मला तिथे अनेक जण भेटले.
सर्वांच्या मुखी फक्त एकच नाव होतं मोदीजींचे. अनेक उद्योगपती तिथे आले होते. त्यांना गॅरंटी आहे मोदीजी पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करणार आहेत. आमच्या राज्यात देखील डबल इंजिन सरकार बनणार आहे”, असा विश्वास मुख्यमंत्री ऐकणं शिंदेंनी व्यक्त केला.
त्याचबरोबर “एक ग्लोबल लीडर, व्हिजनरी लीडर आपल्याला मिळाले आहेत. अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं, पण आज मंदिर पूर्ण होत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रे हाऊस होत आहेत. संपूर्ण देशात रे हाऊस व्हायला हवं असे मोदींजींनी सांगितले होते. 80 करोड लोकांना मोफत अन्न मोदीजी देत आहेत. देशातल्या लोकांनी गॅरंटी दिलीय फिर एक बार मोदी सरकार और चारशे पार, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
Prakash Ambedkar : ‘मनोज जरांगे यांनी राजकारणात एन्ट्री करावी’ – प्रकाश आंबेडकर
उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे… PM मोंदीच्या उपस्थितीत मंचावरील एका भाषणाने व्यासपीठावर ‘गोंधळ’