वाघोली : आयोध्या धाम येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोमवारी साजरा होणार असल्याने तसेच केसनंद गावामध्ये देखील श्रीराम मंदिर येथे मोठा उत्सव साजरा होणार असल्याने गावातील मटन, चिकन मच्छी, तसेच देशी-विदेशी दारू विक्री करण्यासाठी बंदी करण्यात आली असल्याचे पत्र सरपंच प्रमोद हरगुडे यांनी सर्व विक्रेत्यांना काढले आहे.
मटन, चिकन, मच्छी विक्री दुकाने, चायनीज दुकाने, मांसाहारी हॉटेल, अथवा ढाबा दुकाने मालकांनी कोणत्या प्रकारची दुकाने संपूर्णतः बंद ठेवावी व सर्व विक्रेत्यांनी दुकानदारांनी या सूचनेची दखल घेऊन राम उत्सव व ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच प्रमोद चंद्रकांत हरगुडे यांनी केले आहे.