‘अजय देवगण’ची सेटवर वापसी, ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’चं शूटिंग सुरु

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण हा सुमारे 8 महिन्यांनंतर पुन्हा सेटवर परतला आहे. त्याने त्याचा आगामी “भूज : द प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू केली आहे. या चित्रपटाचे लॉकडाऊनच्या आधीही बरेच चित्रीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. 

आता ते अंतिम टप्प्यात असून चित्रपटाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. हा चित्रपट 1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आधारित असून यात अजय देवगण स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हवाई दलाच्या युद्धातील योगदानावर असून कर्णिक हे भारत-पाक युद्धादरम्यान हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते.

भारत-पाकच्या या युद्धात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उद्‌ध्वस्त झाली. यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील महिलांची तळ बांधणीसाठी मदत घेतली. यानंतर कर्णिक यांनी सुंदरबेनसहित 300 महिलांच्या मदतीने पुन्हा एअरबेस उभारले. 

या चित्रपटात सुंदरबेनची भूमिका अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा साकारणार आहे. याशिवाय संजय दत्त देखील निर्णायक भूमिकेत दिसणार आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास अजय लवकरच “मैदान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.