महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये विमानाला घेऊन जाणारा ट्रक पुलाखाली अडकल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हे विमान भारतीय पोस्टचे आहे. भारतीय पोस्टमधून हे विमान सेवामुक्त करण्यात आले आहे. विमान जुने आणि जीर्ण होऊ लागल्यामुळे ते उड्डाणासाठी वापरण्यात येत नव्हते. त्यामुळे हे विमान ट्रकच्या सहाय्याने दुसरीकडे हलवण्यात येत होते.
West Bengal: A truck carrying an abandoned India Post aircraft has got stuck under a bridge in Durgapur. More details awaited. pic.twitter.com/jGXkOuTqHs
— ANI (@ANI) December 24, 2019
सोमवारी रात्री कोलकातावरुन जयपूर येथे हे विमान घेऊन जाण्यात येत होते. त्याचवेळी दुर्गापूर येथील एका पुलाखाली विमान घेऊन जाणारा ट्रक अडकला. 22 चाकांच्या ट्रकमधून हे विमान घेऊन जाण्यात येत होते. पुलाखाली अडकलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी त्याच्या चाकातील हवा काढण्यात आली. मात्र यामध्ये सुध्दा यश आले नाही. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान 2007 साली सेवेत रुजू करण्यात आले होते आणि मागच्या वर्षीच याला सेवामुक्त करण्यात आले होते. देशाअंतर्गत पोस्टाची सेवा आणि वस्तू पोहचवण्यासाठी हे विमान वापरले जात होते. दरम्यान, पुलाखाली विमान अडकल्याची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.