कार्तिकने काढले अनन्या आणि भूमीचे नकली केस 

कार्तिक आर्यनने एक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तो अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर बरोबर मस्ती करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ “पती, पत्नी और वो’च्या शुटिंगच्यावेळचा आहे. “अखियोंसे गोली मारे’ या गाण्याचे शुटिंग सुरू आहे. म्युझिक सुरू झाल्याबरोबर कार्तिक, अनन्या आणि भूमीने डान्स करायला सुरुवात केली.

नाचता नाचता कार्तिक अनन्या आणि भूमीच्या केसांमधून हात फिरवतो. दोघींनीही केसांचे विग लावलेले असतात. हे विग कार्तिक ओढून काढून टाकतो. गाण्याच्या आणि डान्सच्या मूडमध्ये असलेल्या भूमी आणि अनन्याला काही कळायच्या आत त्यांचे नकली केसांचे विग सेटवर पडलेले असतात.

ही बाब या दोघींच्या लक्षातही येत नाही. त्यांचा डान्स तसाच सुरू राहतो. मात्र सेटवरच्या एक्‍स्ट्रॉ आर्टिस्ट आणि कॅमेरामनच्या लक्षात ही बाब आलेली असते. त्यामुळे हा सीन पुन्हा शुट केला गेला असावा. मात्र आपली स्वतःची करामत या दोघींच्या लक्षात आलेली नाही, हे बघून कार्तिकला खूप हसायला येते. हा व्हिडीओ बघून आपल्यालाही खूप हसायला येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.