रफाह (गाझा पट्टा) – इस्रायलने गाझा पट्ट्यामध्ये दोन घरांवर केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबाशी संबंधित ९० जण ठार झाले आहेत. संयुक्त राषट्राच्या सरचिटणीसांनी कालच गाझामधील स्थिती पूर्णपणे असुरक्षित असून इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मानवतावादी मदतीचे वाटप करण्यात अडथळे येत असल्याचे म्हटले होते. त्याच्या दुसर् याच दिवशी इस्रायलने हा हवाई हल्ला केला. याशिवाय नुसेरत भागातील शरणार्थ्यांच्या छावणीवरही इस्रायलने बॉम्बफेक केली.
ज्या दोन घरांवर हवाई हल्ले झाले, त्यात एकाच कुटुंबाशी संबंधित अनेक नातेवाईक रहात होते. मृतांमध्ये काही महिला आणि बालकांचाही समावेश होता. इस्रायलच्या सैनिकांनी गेल्या आठवड्याभरात गाझामधील कथिक शेडो दहशतवाद्यांना अटक केल्याचाही दावा केला आहे.
अटक केलेल्यांपैकी २०० जणांना अधिक चौकशीसाठी इस्रायलला पाठवून देम्यात आले आहे. हमास आणि इस्लामिक जिहादशी संबंधित असल्याच्या आरोपावरून ७०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध पुकारल्यापासून आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
तर ५३ हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. युद्धबंदीसाठी इस्रायलवर मोठा आंतरराष्ट्रीय दबाव येतो आहे. मात्र तरिही जोपर्यंत हमासला संपूर्णपणे संपवले जात नाही आणि हमासच्या ताब्यातील सर्व ओलिसांची सुटका केली जात नाही, तोपर्यंत युद्ध न थांबवण्याच्या निर्णयावर इस्रायल ठाम आहे.