नगर -शिक्षक बॅंकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक मंडळांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बॅंक निवडणुकीसंदर्भात ऐक्य मंडळाची जिल्हा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ऐक्य मंडळाने शिक्षक बॅंक निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला, अशी माहिती संघटनेचे राज्य संघटक राजेंद्र निमसे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम व ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड यांनी दिली
या बैठकीत बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भातील धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. या जिल्हा बैठकीत कोणत्याही मंडळावर अथवा संघटनेवर टीका न करता राज्य व जिल्हा पातळीवरील संघटनात्मक कामकाज, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत घेतलेले धोरण सभासदांसमोर सांगितले जाणार आहे. तसेच लवकरच जिल्हास्तरीय मेळाव्याचे नियोजन करून शिक्षक सभासदासमोर बॅंकेबाबत धोरण जाहीर केले जाईल.
प्राथमिक शिक्षक बॅंक निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, सर्जेराव राऊत, राजकुमार शहाणे, सुनील शिंदे, शरद वांढेकर, प्रदीप चक्रनारायण, रज्जाक सय्यद, संदीप शेळके, संजय सोनवणे, लक्ष्मण चेमटे, नंदू गायकवाड, पांडुरंग देवकर, संतोष ठाणगे, सुनील कदम, मधुकर थोरात, बाळू जाधव, संजय बडधे आदी उपस्थित होते.