नवी दिल्ली- अयोध्या येथील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने २२ जानेवारीला दुपारी अडीच वाजेपर्यंत ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्लीतील एम्स हॉस्पिटलने घेतला होता.
परंतु त्या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने हा निर्णय मागे घेतला आहे. हे रूग्णालय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते.
या संबंधात एम्सने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की रूग्णालयाच्या ओपीडी विभागाला अर्धा दिवस सुट्टी देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला असून
रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आणि रूग्ण सेवा सुविधा देण्यासाठी बाह्यरुग्ण सेवेसह सर्व क्लिनिकल सेवा खुल्या राहतील. दिल्लीतील अन्य केंद्र सरकारी रूग्णालयांनीही असाच निर्णय घेतला आहे. त्यांनीही या आधी २२ जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली होती.