नगर – ऐन सणासुदीच्या काळामध्ये नगर शहरासह कापड बाजारामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापारी व नागरिक यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी नगर शहरात येत आहे. कापड बाजारामध्ये आधीच मंदीचे दिवस असून आता दिवाळीनिमित्त ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येत असून त्यात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने त्याचा खरेदी विक्रीवर परिणाम होत आहे. सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित केल्यास अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिला.
कापड बाजारातील विद्युत पुरवठा अखंडित सुरु राहण्यासाठी अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी किरण व्होरा, शाम देडगावकर, प्रकाश बायड, दीपक नवलानी, राहुल मुथा, प्रतिक बोगावात, अभय गांधी, शामभाऊ काथेड, सोनू भटेजा, सुमित कुलकर्णी, गजेंद्र भांडवलकर, सोमा तांबे, शुभम टाक, बाबू औताडे, सचिन निक्रड आदी उपस्थित होते. दिवाळी निमित्त जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी नगर शहरात येत आहे. त्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्याचा खरेदी विक्रीवर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.