अकोले -दीपावलीच्या पूर्वसंध्येला पणत्यांनी सजलेला दीपोत्सव, आकाश कंदीलांची सजावट, दिव्यांच्या रोषणाईने नटलेल्या प्रसन्न वातावरणात अभिनव शिक्षण संस्थेत अभिनवच्या परंपरेनुसार सांज दीपावली मैफिलीने अकोलेकरांची मने जिंकली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख इंद्रभान कोल्हाळ यांच्या संयोजनात हा रंगतदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात संस्थेच्या मारूतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, वसुंधरा अकॅडेमी, अभिनव प्री- स्कूल, सह्याद्री व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल राजूर, मुळा व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल कोतूळ या विभागातील विद्यार्थी, शिक्षक पालक यांनी अप्रतिम भावगीते,
भक्तीगीते, समूहनृत्ये, वैयक्तिक नृत्ये, मंगळागौर आणि भारतीय परंपरेतील वेगवेगळे लक्षवेधी नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, उपाध्यक्षा डॉ.जयश्री देशमुख, कोषाध्यक्ष विक्रम नवले, प्रा.अपर्णा श्रीवास्तव,उपाध्यक्ष रमेश जगताप, संचालक भाऊसाहेब झोळेकर, दिलीप मंडलिक, विठ्ठलराव धुमाळ, सूर्यभान नाईकवाडी, शरद पानसरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत मंडलिक, प्राजक्ता सोलापुरे, श्रद्धा पाटील, माया शिंदे यांनी केले.