कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील शिये इथल्या गायरान गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन होऊनही करवीर चे तहसीलदार कोणतीही कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुरूम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाणाऱ्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. माणिक शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. अखेर पोलिसांनी मुरुमाचं पोतं काढून घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं.
करवीर तालुक्यातील शिये गावात सर्वे नंबर 259 व 283 मधील गायरान जमिनीत काही लोकांनी अतिक्रमण करून गौण खनिजाचे उत्खनन केला आहे. याविरोधात वारंवार शेतकरी संघटनेने आवाज उठवत करवीर तहसीलदारांकडे तक्रार केली होती मात्र याबाबत करवीर तहसिलदारांनी कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात निदर्शने करण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुरुमाच पोत जिल्हाधिकारी कार्यालयात नेत असताना पोलिसांनी आंदोलकांची झटापट झाली.दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यावर ती कारवाई न झाल्यास महसूल मंत्र्यांच्या दारात मुरूम विस्कटू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.