जळगावत भाजपच्या पराभवानंतर दरेकरांनी केले सेनेवर आरोप म्हणाले,…

जळगाव : जळगाव महापालिकेवर अखेर भगवा फडकावला आहे. शिवसेनेने याठिकाणी सांगली पॅटर्न राबवत भाजपला सत्तेतून बाहेर फेकले आहे. सेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेने तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे.

भाजपाला हा पराभव चांगलाच जिव्हारी चांगली. भाजपाच्या या पराभवानंतर ”सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला हा विजय” असल्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

दरम्यान,जळगाव महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. त्यांनी बहुमताचा ३८ हा आकडा पार केला आहे. त्यामुळे ते जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने 45 तर भाजपला 30 मते मिळाली आहे.

बहुमताचा आकडा पार केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला. महापालिके -च्या  बाहेर सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. यात प्रारंभी अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले. याप्रसंगी सभागृहात वाद झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.