पुणे -: भिडे वाडा येथे स्मारक करण्याचा प्रश्न सुटल्याबाबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि रिपाइंचे नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी एकमेकांना पेढा भरवत जल्लोष केला.
पुणे – भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी भूसंपादनाबाबत न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या ाजूने लागला. यावर सर्व राजकीय पक्षांच्या वतीने भिडेवाडा परिसरात जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकार्ते पेढे, साखर वाटत, तसेच फटाके वाजवत आनंदोत्सव सहभागी झाले. निकालानंतर लगेच रिपाइंच्या वतीने पेढे वाटण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, बाळासाहे जानराव, अशोक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर, भाजपतर्फे यावेळी साखर वाटण्यात आली. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेविका मनिषा लडकत,धनंजय जाधव, संदीप लडकत, तुषार रायकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
तर, अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्यावतीने पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रदेशअध्यक्षा मंजिरी धाडगे, माजी आमदार कमल ढोले पाटील, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, पंढरीनाथ बनकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने पाऊल पुढे पडले आहे. यासाठी 50 कोटींच्या निधीची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. राज्य शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सर्व पुणेकरांचे अभिनंदन.
– प्रमोदनाना भानगिरे, शहराध्यक्ष, शहरप्रमुख, शिवसेना
शरद पवार यांनी अनेकदा भिडेवाड्यास भेट देऊन तेथील दुकानदार, नागरिक यांच्यासोबत चर्चा केली होती. आजच्या निकालाने आमच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना आहे. याठिकाणी भव्य स्मारक व्हावे, हे स्वप्न पूर्णत्वास जाणार ही ा अतिशय आनंदाची आहे.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार).
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत. आता प्रशासनाने स्मारकाचे काम सुरू करावे. गेली कित्येक वर्षे याबाबत आंदोलने झाली. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने भिडे वाड्यासंदर्भात राज्य शासन, मनपा यांना वेळोवेळी भेटून निवेदने दिली. स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.
– दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)