मोदींनी राफेल करार करताच फ्रांस सरकारकडून अनिल अबांनींना 1125 कोटींची करमाफी – फ्रेंच वृत्तपत्राचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांस सरकारशी 36 राफेल विमाने थेट चर्चा करून खरेदी करण्याचा करार केल्यानंतर लगेच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला फ्रांसमध्ये तब्बल 144 दशलक्ष युरो म्हणजेच 1125 कोटी रूपयांची करमाफी देण्यात आली असा गौप्यस्फोट ली मोंडे नावाच्या फ्रेंच वृत्तपत्राने केला आहे.

अनिल अंबानी यांची रिलायन्स फ्लॅग ऍटलांटीक फ्रांस नावाची एक टेलिकॉम कंपनी फ्रांस मध्ये कार्यरत आहे. या कंपनीकडे सन 2015 साली 60 दशलक्ष युरोची करांची थकबाकी असल्याचा अहवाल तेथील सरकारी ऑडिटरने दिला होता. गेली अनेक वर्षे हा विषय प्रलंबीत होता. त्यावेळी अनिल अंबानी यांच्या कंपनीने सरकारशी भारतीय चलनाच्या किंमती नुसार 56 कोटी रूपयांची तडतोड रक्कम भरून हा विषय संपवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण त्यानंतरच्या काळातही या कंपनीवरील कराची व त्यावरील दंडाची रक्कम वाढत गेली.

दरम्यानच्या काळात मोदींनी एप्रिल 2015 मध्ये फ्रांसचा दौरा करून राफेल विमान खरेदी करार करण्याची घोषणा केली आणि सप्टेंबर 2016 ला प्रत्यक्ष त्यांनी राफेल करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर लगेच फ्रांस सरकारने अनिल अंबानी यांना 144 दशलक्ष युरोची करमाफी जाहीर केली. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 1125 कोटी इतकी होते. दरम्यान अनिल अंबांनी यांच्या कंपनीने या वृत्ताचा इन्कार केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.