नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अप्रतिम काम केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे असे कौतुक ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पंतप्रधान मोदी आणि एकूणच मोदी सरकारबाबत केले आहे. एवढेच नाही तर या ब्रिटीश खासदाराने भारतीय जनता पक्षाला आपला पक्ष, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा सहयोगी मित्रपक्ष असल्याचे देखील म्हंटले आहे.
ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे अद्भुत काम केले आहे. भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. भारत जगातील सर्वात मोठा लोकसंख्येचा देश बनणार आहे आणि तो जगातील सर्वात मोठा लोकशाही मानणारा देश देखील आहे.
एका वृत्तसंस्थेशी संभाषण करताना, बॉब ब्लॅकमन यांनी भारतीय जनता पक्षाला त्यांच्या पक्षाचे, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नैसर्गिक सहयोगी म्हणून वर्णन केले आणि दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांची कबुली दिली. ब्लॅकमन म्हणाले की, मला वाटतं, मी दीर्घकाळ भाजपचा समर्थक आहे त्यामुळे भाजप आणि ब्रिटनचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष हे मित्रपक्ष असल्यासारखे वाटत आहेत. ब्रिटनमध्ये जसा कंझर्व्हेटिव्ह पक्ष आहे, तसाच भारतात भाजप आहे.
As far as I am concerned I’ve been a supporter of Overseas Friends of BJP for a long time. I regard BJP as a natural ally for the UK’s Conservative Party. The Conservative party in UK and BJP over here, it is that friendship, that support we value: British MP Bob Blackman pic.twitter.com/z2fP6bHKmh
— ANI (@ANI) February 17, 2023
आंतरराष्ट्रीय पातळीवरून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एका विदेशी नेत्याने भाष्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बॉब ब्लॅकमन यांनी यावेळी भारताचे शेजारी असलेल्या पाकिस्तानबाबत देखील भाष्य केले. मात्र पंतप्रधान मोदी आणि भाजपचे त्यांनी केलेले कौतुक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.